आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस भरती:मुख्यालयाच्या मैदानावर पोलिस भरती प्रक्रिया सुरू

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सोमवारपासून मैदानी चाचणीला सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी पोलिस चालक पदासाठी चाचणी घेण्यात आली. या चाचणीसाठी चाचणीसाठी २०० उमेदवारांनी हजेरी लावली. यातील ४८ उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीमध्ये बाद ठरवण्यात आले. उर्वरित १५२ उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली.

पोलिस भरतीच्या नगर जिल्ह्यातील १३९ जागेसाठी १२ हजार ३३४ अर्ज दाखल झाले आहेत. आता प्रत्यक्षात मैदानी चाचणीला सुरूवात झाली आहे. सोमवारी (२ जानेवारी) व मंगळवारी (३ जानेवारी) या दोन दिवशी चालक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात आले आहे. सोमवारी पहाटे पहिल्या दिवशी २०० उमेदवार मुख्यालयाच्या मैदानावर हजर झाले होते. स्वत: जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.

सुरूवातीला उपस्थित उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर उंची, छातीचे मोजमाप करण्यात आले. यानंतर गोळा फेक व १६०० मीटर धावण्याची चाचणी पार पडली. उद्या बुधवारपासून पोलिस शिपाई पदाच्या १२९ जागांसाठी मैदानी चाचणीला सुरूवात होणार आहे. प्रत्येक दिवशी एक हजार उमेदवार हजर राहणार आहे. १४ जानेवारीपर्यंत मैदानी चाचणी प्रक्रिया सुरू राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...