आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात देशातील अनेक राज्यांत सुरू असलेल्या तरूणांच्या हिंसक आंदोलनाची धग कायम आहे. या पार्श्वभूमीवर नगर रेल्वे प्रशासनही सर्तक झाले आहे. रविवारी रेल्वे पोलिस व कोतवाली पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात रूट मार्च काढला. रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
रूटमार्चमध्ये कोतवाली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे हे पथकासह सहभागी झाले होते. रेल्वे पोलिस दलाचे आयपीएफ सतपाल सिंग, पीएसआय संजय लोणकर यांच्यासह अग्निशमन दलही या रूट मार्चमध्ये सहभागी होते. दुसरीकडे रेल्वे पोलिसांनी जिल्हा पोलिस दलाकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना पत्र पाठविले आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात देशभर आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. नगर, श्रीरामपूर, नारायडोह, राहुरी, विळद येथील स्टेशनवर उभ्या असलेल्या गाड्यांना संरक्षण म्हणून पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. दरम्यान, नगर रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. सध्या सुमारे ५० अधिकारी, कर्मचार्यांचा बंदोबस्त आहे. आवश्यकता वाटल्यास कोतवाली पोलिसांचा बंदोबस्तही मागवण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.