आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Political Favoritism In The City Due To The Work Of The Flyover; Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Group Will Inspect The Flyover Today| Marathi News

राजकारण:उड्डाणपुलाच्या कामावरून शहरात रंगणार राजकीय श्रेयवाद; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आज करणार उड्डाणपुलाची पाहणी

नगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पूर्णत्वास आलेल्या कामावरून श्रेयवाद सुरू झाल्याचे चित्र आहे. खासदार सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांनी उड्डाणपुलाच्या कामाची संयुक्त पाहणी करत लोकार्पणाची तारीख जाहीर केली. त्यानंतर सोशल मीडियात टीका-टिपण्या सुरू झाल्या आहेत. आता नगर शहर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आज (गुरुवारी) उड्डाणपुलाची पाहणी करण्यात येणार आहे.

दोन दिवसांपूर्वीच खासदार विखे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या समवेत उड्डाणपुलावरुन प्रवास करत तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा करत पाहणी केली. १९ नोव्हेंबरला केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाचे उद‌॰घाटन व लोकार्पण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी उड्डाणपुलासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी शिवसेनेचे दिवंगत नेते अनिल राठोड यांचे नाव विखेंकडून न घेण्यात आल्याने शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे या दोन्ही गटांकडून सोशल मीडियात टीका टिपण्णी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून स्वतंत्र पाहणी कार्यक्रम ठेवण्याचे आल्याने श्रेयवाद सुरु झाल्याचे चित्र आहे.

उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी व निरीक्षण करण्यासाठी शिवसेनेच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, आघाड्यांचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना व शिवसैनिकांनी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता उपस्थित राहण्याच्या सूचना सोशल मीडियातून देण्यात आल्या आहेत. महापौर रोहिणी शेंडगे, शहरप्रमुख संभाजी कदम, युवासेना सहसचिव विक्रम राठोड यांनी याबाबत आवाहन केले आहे. शिवसेनेकडून आयोजित करण्यात आलेल्या या पाहणी कार्यक्रमामुळे श्रेयवाद चिघळण्याची चिन्हे आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या फेसबुक पेजवरून खासदार-आमदारांच्या पाहणी कार्यक्रमावर टीका टिप्पण्या सुरू आहेत. खासदार सुजय विखे यांनी पुलासाठी पाठपुरावा करणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचा नामोल्लेख टाळल्याने ‘खासदार साहेब तुम्ही विसरलात का?’, असा सवाल करत शिवसेनेने त्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता. आता शिवसेनेने पुन्हा पाहणी कार्यक्रम ठेवल्याने येत्या काही दिवसात श्रेयवाद रंगण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचाही विखेंना घरचा आहेर!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत भाजपने राज्यात नवी सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे स्थानिक नगरच्या स्तरावरही भाजप व मुख्यमंत्री शिंदे समर्थक शिवसेनेचे सूत जुळणे आवश्यक होते. प्रत्यक्षात तसे चित्र दिसून येत नाही. माजी आमदार अनिल राठोडांचे नाव टाळल्याने नगरच्या शिंदे सेनेने त्यांना घरचा आहेर दिल्याचे चित्र आहे. खासदार विखे पाटील हे अनिल राठोड यांच्या मदतीमुळे खासदार झालेत. राठोड यांनी उड्डाणपुलासाठी आंदोलने आणि पाठपुरावा केला होता. तरीही विद्यमान खासदार सुजय विखे पाटील हे अनिल राठोड यांचे नावही घेत नाही, अशी टीका शिंदे सेनेने फेसबुक पेजवर केली आहे.

ठाकरे गटाकडून खासदार सुजय विखे झाले लक्ष्य
खासदार सुजय विखे यांनी कामासाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानताना माजी आमदार अनिल राठोड यांचे नाव विसरल्याचा मुद्दा पुढे करत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून टीका केली जात आहे. ठाकरे शिवसेनेच्या फेसबुक पेजवर ‘सुजय दादा आता विसरलात तुम्ही, पण आम्ही विसरणार नाही’, अशी पोस्ट करण्यात आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून राठोडांमुळे खासदार झाले असतानाही डॉ. विखे आता राठोडांचे नावही घेत नाहीत, हे दुर्दैव असल्याचे भाष्य करण्यात आले आहे. आमदार जगतापांवर दाखवलेल्या प्रेमामुळे विखे अडचणीत आल्याचे चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...