आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्यांची हजेरी:सुवेंद्र गांधी यांच्या दिवाळी फराळाला राजकीय नेत्यांची हजेरी

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळी निमित्त माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी फराळ व स्नेहमेळाव्याचे आयोजन नगर शहरात केले होते. दोन वर्षांच्या खंडानंतर झालेल्या फराळाच्या कार्यक्रमास नगर शहर व जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व सर्व क्षेत्रतिल नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तुतारीच्या निनादात मराठमोळ्या पध्दतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी आमदार राम शिंदे, बबनराव पाचपुते, भाजपा शहराध्यक्ष महेंद्र गंधे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष माणिक विधाते, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, ज्येष्ठ नेते आसाराम ढुस, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर गीतांजली काळे, सर्व पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, अर्बन बँकेसह विविध बँकांचे संचालक, सभापती, शासकीय अधिकारी, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सरोज गांधी, सुवेंद्र गांधी, देवेंद्र गांधी, अर्बन बँकेच्या उपाध्यक्ष दीप्ती गांधी, प्रगती गांधी आदींनी स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...