आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:संख्याबळ नसताना केलेले काम हे राजकारण ; पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया

नगर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे ५ उमेदवार, काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचे उमेदवार निवडून आले त्यांचे सर्वांचे अभिनंदन भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी केले. संख्याबळावर केलेले काम हे समाजकार्य नसते तर संख्याबळ नसताना केलेले हे काम हे राजकारण असते दोन्हीची आवश्यकता राजकारणात लागते, अशी खोचक प्रतिक्रिया भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. अहमदनगर येथील नागापूर औद्योगिक वसाहतीतील स्नेहलयाच्या वतीने मंगळवारी सकाळी आयोजित जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे यावेळी उपस्थित होते. मुंडे म्हणाल्या ,राज्यसभेच्या कलाने विधानपरिषदेचा ही निकाल जाईल ही अपेक्षा होतीच. अशा अनेक निवडणुका आम्ही लढलो, जिंकलो जिथे संख्याबळ कमी होते तेथे. जिल्हा परिषद असो किंवा विधानसभा निवडणुकीत असो. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी १७ मते एकदा फोडली होती, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

सरकार अस्थिरतेबद्दल मी भाष्य करणार नाही विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात सुरु असलेल्या अनेक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना सरकार अस्थिरतेबद्दल विचारले असता मी यावर भाष्य करणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया दिली.

बातम्या आणखी आहेत...