आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसला वैभवशाली परंपरा‎:देशात धर्माच्या नावावर होणारे‎ राजकारण लोकशाहीला घातक‎, बाळासाहेब थोरात यांची खंत

प्रतिनिधी | संगमनेर‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात धर्माच्या नावावर होणारे राजकारण ‎ ‎ लोकशाहीला घातक आहे. काँग्रेसचा‎ विचार सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. ‎राज्यभरात महाविकास आघाडीला‎ अनुकूल वातावरण आहे. आगामी काळात ‎ ‎ राज्यात व देशात सत्ता बद्दल निश्चित असून ‎ ‎ युवकांना काँग्रेस पक्षात मोठी संधी‎ असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब ‎थोरात यांनी केले.‎

थोरात कारखाना कार्यस्थळावर संगमनेर ‎तालुका व शहर युवक काँग्रेस‎ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आमदार थोरात‎ बोलत होते. डॉ. जयश्री थोरात,‎ तालुकाध्यक्ष मिलींद कानवडे, शहराध्यक्ष‎ सोमेश्वर दिवटे, अजय फटांगरे, रामहरी‎ कातोरे, निखील पापडेजा व पदाधिकारी‎ उपस्थित होते.‎ आमदार थोरात म्हणाले, काँग्रेसला‎ वैभवशाली परंपरा आहे. गोरगरिबांच्या‎ विकासाचा शाश्वत विचार आहे.

यूपीए‎‎ सरकारच्या काळात सर्वसामान्यांसाठी‎ राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना,‎ अन्नसुरक्षा कायदा, शिक्षणाचा मूलभूत‎ अधिकार आदी ऐतिहासिक निर्णय होताना‎ देशाची अर्थव्यवस्था भक्कम झाली. मात्र,‎ भूलथापा देऊन सत्तेवर आलेले भाजप‎ सरकार धर्माच्या नावावर राजकारण करत‎ आहे. विकासाऐवजी धार्मिक मुद्दे पुढे केले‎ ‎जात आहेत. वाढलेली महागाई, बेरोजगारी‎ या मूलभूत प्रश्नांवरून लक्ष विचलित कले‎ जात आहे.

वज्रमुठ सभांसह सर्व‎ निवडणुकांमध्ये जनतेचा मोठा पाठिंबा‎ मिळाला आहे. येथील राजकारण सुसंस्कृत‎ असून तालुका विकासाचे मॉडेल आहे.‎ कार्यकर्त्यांची मोठी फळी असल्याने सर्वांना‎ समान संधी दिली जात आहे.‎ ‎ डॉ. थोरात म्हणाल्या, आमदार‎ बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली‎ संगमनेर तालुका विकासातून वैभवकडे‎ वाटचाल करत आहे. सत्यासाठी‎ आपल्याला संघर्ष करायचा आहे. सर्वांनी‎ आपसातील मतभेद दूर करून संघटित‎ होऊन आमदार थोरात यांच्या पाठीशी‎ भक्कमपणे उभे राहावे, असे आवाहन केले.‎

काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करताना आमदार बाळासाहेब थोरात.‎ राजर्षी शाहू महाराजांचे‎ विचार सदैव प्रेरणादायी‎ फुले, शाहू, आंबेडकरांचा पुरोगामी‎ विचार सर्वांना विकासातून पुढे नेणारा‎ आहे. आरक्षणाचे जनक म्हणून‎ ओळखल्या जाणाऱ्या राजर्षी शाहू‎ महाराजांनी समाजात समानता‎ आणण्यासाठी केलेले कार्य पुढील‎ पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे‎ सांगून १०१ व्या स्मृतिदिनानिमित्त राजश्री‎ शाहू महाराजांना आमदार थोरात यांनी‎ अभिवादन केले.‎

राजर्षी शाहू महाराजांचे‎ विचार सदैव प्रेरणादायी‎ फुले, शाहू, आंबेडकरांचा पुरोगामी‎ विचार सर्वांना विकासातून पुढे नेणारा‎ आहे. आरक्षणाचे जनक म्हणून‎ ओळखल्या जाणाऱ्या राजर्षी शाहू‎ महाराजांनी समाजात समानता‎ आणण्यासाठी केलेले कार्य पुढील‎ पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे‎ सांगून १०१ व्या स्मृतिदिनानिमित्त राजश्री‎ शाहू महाराजांना आमदार थोरात यांनी‎ अभिवादन केले.‎ काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करताना आमदार बाळासाहेब थोरात.‎