आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:130 ग्रामपंचायतीच्या 140 रिक्त पदासाठी 5 जूनला होणार मतदान; पोटनिवडणुकांसाठी 13 मेपासून होणार उमेदवारी अर्ज दाखल

नगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निधन, राजीनामा, अपात्र व अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या नगर जिल्ह्यातील १३० ग्रामपंचायतीच्या १४० रिक्त पदासाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या असून, या निवडणुकीसाठी ५ जूनला मतदान होणार आहे. १३ मे पासून या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे सदस्यांसह नव्या इच्छुकांचे लक्ष लागले.

५ जूनला मतदान घेण्यात येणार आहे. ६ जूनला मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी जाहीर केलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचे सूचना देणारे परिपत्रक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांना पाठवले आहे. जिल्ह्यातील १३० ग्रामपंचायतीच्या १४० रिक्त पदासाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत.

या निवडणुकांसाठी १३ ते २० मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्जाची छाननी २३ मे ला करण्‍यात येणार असून, २५ मे अर्ज माघारीसाठी मुदत देण्यात आली आहे. ५ जून लाख मतदान, तर ६ जूनला मतमोजणी करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...