आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:अमृतसागर दूध संघासाठी उद्या  कन्या विद्या मंदिरमध्ये मतदान

अकोलेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघ मर्यादित, अकोले या संस्थेच्या २०२२ ते २०२७ कालावधीतील संचालक मंडळासाठी येत्या रविवारी (ता. ८) मतदान होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून मतदान जागेवरुन वाद सुरु होता. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर अमृतसागर निवडणुकीसाठी मतदानाची जागा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केली. अताएसो संचलित कन्या विद्या मंदिर येथील इमारतीत सर्वसाधारण व इतर मतदार संघनिहाय सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानानंतर लगेच मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील, असे प्रकटन निवडणूक निर्णय अधिकारी दीपक पराये यांनी सांगितले.

दरम्यान, अमृतसागर दूध संघावर पुढील ५ वर्षांसाठी कोणाची सत्ता येणार, यावरुन दावे-प्रतिदावे केले जात आहे. अगस्ती साखर कारखाना निवडणुकीत आमदार डॉ. किरण लहामटे व तत्कालीन उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी महाविकास आघाडीचे बेरजेचे राजकारण करताना पिचड पिता-पुत्रास धोबीपछाड दिला होता. आता अमृतसागर दूध संघावरही ते बाजी मारणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

बातम्या आणखी आहेत...