आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील इंदिरानगर भागातील अंगणवाडीची दुरवस्था झाली आहे. या परिसराची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते ईजाज शेख यांनी निवेदनाद्वारे नगरपरिषदेकडे केली आहे.
मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,इंदिरानगर भागात असणाऱ्या अंगणवाडीमध्ये इंदिरानगर सह शिवशक्ती नगर,पालवेवस्ती आदी भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात.मात्र अंगनवाडी परिसरात नेहमीच प्रचंड घाणीचे साम्राज्य असते.यामुळे विद्यार्थ्यांना नेहमी दुर्गंधीचा मोठा सामना करावा लागतो.तसेच या ठिकाणी मद्यपी दारू पिऊन धिंगाना घालतात. रिकाम्या दारुच्या बाटल्या फोडत असल्याने याचादेखील विद्यार्थी,पालक व शिक्षकांना त्रास होतो.
याची तातडीने दखल घेऊन नगरपरिषदेने तात्काळ स्वच्छता करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.याबाबत इजाज शेख म्हणाले की,लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असल्याने नगरपरिषदेने नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे.अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.
निवेदनावर अंगणवाडी सेविका स्वाती सोनवणे,अश्विनी बोंदुल, शैलेश उगार, कैलास जठार, समीर शेख, बाबू धोत्रे फिरोज मणियार, संतोष अंतरकर, महेंद्र दिनकर, सचिन तरटे, संदीप काळोखे, लखन शेख आदींच्या सह्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.