आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील पोहेगावला जोडणारा पोहेगाव ते डोऱ्हाळे रोड अत्यंत खराब झाला असून या रोडवर खड्डेच खड्डे पडले आहेत. खड्ड्यामुळे दररोज अपघात घडतात. या रस्त्याचे तातडीने काम होणे गरजेचे असल्याचे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक ज्ञानदेव औताडे यांनी सांगितले.
गोदावरी कालव्याच्या पुलाच्या बाजूला स्टील घेऊन जाणारा ट्रक काल या खड्ड्यांमुळे पलटी झाला सुदैवाने आजूबाजूला कोणी नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र, असे प्रसंग वारंवार घडत असल्यामुळे वाहन चालक या रोडने जाण्यास कंटाळले. या रोडणे पोहेगाव येथे मुख्य बाजारपेठ असल्याने व्यापारी व आसपासच्या गावातील नागरिक पोहेगावमध्ये कामानिमित्त येतात. पोहेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे परिसरातील अनेक रुग्णांना याच रस्त्याने जावे लागते. रात्री-अपरात्री गरोदर महिलेना प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात या मार्गाचे नेण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींना मोठी कसरत करावी लागते.
आता तर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे व कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या ऊस तोडी देखील चालू आहे. मात्र, या रोडला अनेक खड्डे असल्यामुळे ऊस तोडणी कामगारांना देखील मोठी कसरत करावी लागते. हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून या रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे बिपीन कोल्हे व विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांचे रस्त्याच्या कामासाठी लक्ष वेधले. या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल, असेही संचालक ज्ञानदेव औताडे यांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.