आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवरेबाजार ग्रामपंचायत निकाल:हिवरेबाजारात पोपटराव पवारांचे वर्चस्व कायम, आदर्श ग्राम पॅनलचा 7-0 ने दणदणीत विजय

अहमदनगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यावर्षी हिवरेबाजारमध्ये 30 वर्षांची परंपरा खंडीत होऊन निवडणूक झाली

संपूर्ण देशात आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिवरेबाजार ग्रामपंचायत निवडणुकीत पोपटराव पवार यांच्या आदर्श ग्राम विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. पोपटराव पवार यांच्या पॅनलने विरोधकांचा 7-0 असा जोरदार पराभव केला आहे. त्यामुळे हिवरेबाजार ग्रामपंचायतींवर पुन्हा एकदा पोपटराव पवार यांचे वर्चस्व कायम असल्याचे पाहायला मिळत आहेत.

हिवरेबाजारमध्ये 30 वर्षांची परंपरा खंडीत

हिवरेबाजारमध्ये यावर्षी गेल्या 30 वर्षांची परंपरा खंडीत झाली होती. येथे 1989 पासून निवडणूक बिनविरोध होत आली आहे. यावेळी मात्र ती होऊ शकली नाही. हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवार यांचा शब्द अंतिम मानला जात होता. त्यामुळे 7 सदस्यीय ग्रामपंचायत 1989 पासून बिनविरोध राहिली. पण यंदा ही परंपरा खंडीत झाली असून सातही जागांसाठी निवडणूक पार पडली. पण पोपटराव पवार यांच्या आदर्श ग्रामविकास पॅनलला विजय मिळाल्याने हिवरे बाजारमधील ग्रामस्थांनी पोपटराव यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दाखवल्याचे दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...