आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासवाटा:सुविधांमुळे वाढतेय कल्याण रस्ता भागात वस्ती‎

नगर‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-कल्याण रोड परिसरात गेल्या काही‎ दिवसांपासून मिळत असलेल्या मुलभूत‎ सुविधांमुळे येथील नागरी वस्ती वाढत‎ आहे. येथील नागरिकांना सर्व सुविधा‎ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, या‎ भागात जास्तीत जास्त कामे कशी‎ होतील, याकडे विशेष लक्ष देत आहे.‎ प्रत्येक भागाच्या सर्वांगीण विकासासाठी‎ जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न‎ सुरू असल्याचे प्रतिपादन महापौर‎ रोहिणी शेंडगे यांनी केले.‎ प्रभाग क्रमांक ८ मधील महिला‎ बालकल्याण सभापती पुष्पा बोरुडे,‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नगरसेवक सचिन शिंदे, श्याम नळकांडे‎ यांच्या प्रयत्नातून साईराम सोसायटी‎ येथील रस्त्याच्या कामाचा प्रारंभ महापौर‎ रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाला.

यावेळी‎ संजय शेेंडगे, माजी उपमहापौर अनिल‎ बोरुडे, नगरसेवक गणेश कवडे, सुनील‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शिंदे, सोमनाथ बोऱ्हाडे, उमेश‎ क्षीरसागर, राजेश पंचमुख, मल्हारी‎ वाव्हळ, शंकर बोरुडे, मच्छिंद्र चौकटे,‎ दिनेश शिंदे, कृष्णा तावरे, दिनेश‎ भडकवाड, आशिर सय्यद आदी‎ उपस्थित होते. श्याम नळकांडे‎ म्हणाले, की प्रभागातील प्रत्येक भागाला‎ सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे, यासाठी‎ सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

सहकारी‎ नगरसेवक आणि महापौरांच्या‎ माध्यमातून या भागात जास्तीत जास्त‎ कामे कशी मार्गी लागतील, यासाठी‎ प्रयत्नशिल आहोत.‎ यावेळी अक्षय सूर्यवंशी, बबलू गोंडा,‎ हसन पठाण, रमेश मारपेल्ली, सय्यद‎ खलील, भास्कर केदार, राजेंद्र शंकर‎ औटी, गणेश औटी, सागर वैराळ, महेश‎ लोखंडे, राजू जिंदम, प्रकाश नांगरे,‎ गणेश चव्हाण, मंदा सातपुते, शकुंतला‎ शिंदे, निर्मला चौकटे आदी उपस्थित‎ होते. सचिन शिंदे यांनी आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...