आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य:हर घर तिरंगा अिभयानासाठी टपाल कार्यालये रविवारीही उघडली

नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाला काही दिवस उरले आहेत. केंद्र सरकारने १३ ऑगस्टपासून घरोघरी तिरंगा मोहीम राबवण्याची तयारी केली आहे. मोहिमेसाठी भारतीय ध्वजाचा तिरंगा पुरवण्याची जबाबदारी टपाल कार्यालयांवर सोपवण्यात आली आहे. कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिसमधून २५ रुपयांमध्ये मोठा झेंडा घेऊ शकते. तिरंगा मोहिमेत झेंड्यांची कमतरता भासू नये आणि वेळेपूर्वी प्रत्येक घरापर्यंत तिरंगा पोहोचावा यासाठी रविवारीही टपाल कार्यालये सुरू होते.

केंद्र सरकारने टपाल कार्यालयाच्या माध्यमातून जनतेला तिरंगा देण्याची व्यवस्था केली आहे. कापडी ध्वज २५ रुपयांना दिला जात आहे. रविवारी केडगाव येथील टपाल कार्यालयातून अनेक नागरिकांनी तिरंगा ध्वज खरेदी केला, असे पोस्ट मास्तर संतोष यादव यांनी सांगितले. याप्रसंगी सुखदेव पालवे, पोस्टमन अनिल धनावत आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...