आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक:मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर खड्डे; वाहतूक व्यवस्थेवर प्रशासनातर्फे सूचनांचा भडिमार

नगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर आगामी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खड्डे, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थेवर जिल्हा प्रशासनाकडून सूचनांचा “भडीमार’करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गणेशोत्सव, मोहरम, दहीहंडी या सण-उत्सवांच्या काळात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे. नागरिकांच्या तक्रारी, उत्सवास परवानगी, रस्त्यावरील खड्डे, सार्वजनिक स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्था याबाबत नागरिकांची गैरसोय होणार नाही. याची दक्षता घ्यावी. अशा सूचना जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागप्रमुखांना दिल्या.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महानगरपालिका, नगरपंचायत आणि नगरपरिषद कार्यालयांनी उत्सवकाळात नागरिकांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नेमावा. त्यांच्या संपर्क क्रमांक वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रसिध्द करण्यात करावा. उत्सावाच्या विविध परवानगींसाठी एक खिडकी पध्दतीचा अवलंब करावा. शक्यतो, सर्व परवानग्या एकाच ठिकाणी ऑनलाइन पध्दतीने देण्यात व्याव्यात.

रस्त्यावरील खड्डे विहित पध्दतीने तात्काळ दुरूस्त करावेत. सार्वजनिक स्वच्छता राखण्याबरोबरच पुरेशा आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मंडप भाडे अवाजवी आकारू नये. मंडप उभारणी करतांना न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात यावे. मंडपांचा वाहतूकीला अडथळा होणार नाही, याची काळजी घ्यावी. मंडप तपासणी करणाऱ्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून कामकाज करावे, असे आवाहन केले.

पीओपी मूर्त्यांचा वापर कमी होण्यासाठी जनजागृती करा
गणेशोत्सव काळात आवश्यकतेनुसार जास्तीचे कृत्रिम तलाव उपलब्ध करून द्यावीत. तसेच विसर्जनानंतर माती व मूर्त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. निर्माल्य जमा करण्यासाठी सुस्थितीत असलेले स्वतंत्र वाहन असतील याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक मंडळ परिसर, मिरवणूक रस्ता तसेच विसर्जन घाटावर पुरेसा उजेड पडेल अशी विद्युत व्यवस्था असावी. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचा वापर कमी होण्यासाठी जनजागृती करावी, अशा सूचना ही निचित यांनी संबंधित विभागास दिल्या आहेत

बातम्या आणखी आहेत...