आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोसायटी निवडणुक:मढेवडगाव सोसायटीमध्ये नागवडे‎ गटाची सत्ता, सर्व उमेदवार विजयी‎

श्रीगोंदे‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मढेवडगाव येथील विविध‎ कार्यकारी सेवा सहकारी‎ सोसायटीमध्ये नागवडे प्रणित सुभाष ‎शिंदे व नामदेवराव शिंदे यांच्या ‎ ‎ नेतृत्वाखाली किसान क्रांती पॅनल व ‎जिजाबापू शिंदे यांच्या भैरवनाथ‎ विकास पॅनलमध्ये झालेल्या‎ लढतींमध्ये किसान क्रांती पॅनलच्या ‎ ‎ सर्वच्या सर्व उमेदवारांनी भरघोस ‎मतांनी विजय मिळवला. जिजाबापू‎ शिंदे यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला.‎ सर्वच्या सर्व उमेदवार १०० पेक्षा‎ अधिक मतांच्या फरकाने विजयी‎ झाले. इतर मागास वर्ग‎ उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना‎ होऊन गावचे माजी सरपंच पोपट‎ गोरे यांचा नितीन रासकर या नवख्या‎ उमेदवाराने ८ मतांनी पराभव केला.‎ विजयी उमेदवारांत सर्वसाधारण‎ मतदार संघातून प्रकाश मारुती उंडे,‎ भगवान मारुती कुरुमकर, दत्तात्रेय‎ बाजीराव झुंजरुक, भीमराव कोंडीबा‎ फरकांडे, काकासाहेब दत्तात्रय मांडे,‎ बापुसाहेब आबासाहेब वाबळे,‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ प्रमोद नामदेव शिंदे, शरद गंगाधर‎ शिंदे, अनुसूचित जाती जमाती‎ वसंत भागोजी साळवे, महिला‎ राखीव सुमन मानसिंग मांडे, वर्षा‎ विठ्ठलराव वाबळे, इतर मागास‎ प्रवर्गातून नितीन गुलाब रासकर,‎ भटक्या विमुक्त जाती/ जमाती‎ गटातून अशोक हरिचंद्र शिंदे यांचा‎ समावेश आहे. विजयासाठी‎ बबनराव उंडे, जयसिंग मांडे,‎ पंडितराव वाबळे, रावसाहेब जाधव,‎ हनुमंत झिटे, अशोक कुरुमकर,‎ गोरख मांडे, मधुकर शिंदे, बापूराव‎ मांडे, बाळासाहेब मांडे, शिवाजी‎ जाधव, ज्ञानदेव माऊली उंडे, दीपक‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ वाबळे यांच्यासह अनेक ज्येष्ठ व‎ तरुण कार्यकर्त्यांचे मोठे योगदान‎ राहिले. यावेळी संचालक सुभाष‎ शिंदे म्हणाले, हा विजय सर्व‎ कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा‎ निवडणुकीमध्ये विद्यमान चेअरमन‎ बापूसाहेब वाबळे यांनी संस्थेने‎ गेल्या पाच वर्षांत केलेल्या विविध‎ समाज उपयोगी कामांचा आहे.‎ निवडणुकीमध्ये पुस्तकाद्वारे‎ मांडलेला विकासाचा पॅटर्न यशस्वी‎ झाला तसेच हा विजय म्हणजे‎ कार्यकर्त्यांच्या जीवावर धनशक्ती‎ विरुद्ध जनशक्तीचा विजय असे‎ म्हणावे लागेल, असे सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...