आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न गंभीर:सरकार हुकूमशाही, दडपशाहीने काम करतंय; माजी उर्जा राज्यमंत्री आमदार तनपुरेंचा आरोप

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ,

राज्य सरकारचे काम हे दडपशाही व हुकूमशाही पद्धतीने सुरू आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी आलेले माजी उर्जा राज्यमंत्री तथा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आज अहमदनगर येथे केला.

कोरोनात कर्मचाऱ्यांचे चांगले कार्य

आंदोलनकर्त्यांची माजी ऊर्जा राज्यमंत्री तथा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भेट घेऊन संपला समर्थन दिले. कोरोनाच्या कालावधीत वीज कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून काम केले आहे. या कोरोना काळात प्रकाश देण्याचे काम महावितरण कंपनीने केले. निसर्ग चक्रीवादळात देखील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मोठे काम केले होते. हे व्यासपीठ राजकीय नाही मात्र विधानसभेत याबाबत आम्ही घोषणा दिल्या होत्या.

विधानसभेत बोलू दिले नाही

तनपुरे म्हणाले, विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी आम्हाला बोलून दिले नाही सत्ताधाऱ्यांची एक प्रकारची दडीपशाही सुरू आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. हुकूमशाही पद्धतीने हे सरकार काम करत आहे असा आरोप तनपुरे यांनी यावेळी केला. दरम्यान शहरातील अनेक ठिकाणी रोहित्र बंद झाल्याने त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर देखील झाला होता. त्याचबरोबर वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अन्य व्यवसायावर देखील दिवसभर परिणाम दिसून आला.

वीज गुल

महावितरण कंपनीच्या विलनीकरणाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी संघटनेने बुधवार (4 डिसेंबर) ला संप पुकारून अहमदनगरच्या मुख्य महावितरण कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी विलणीकरणाच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वीज अनेक तास गुल झाली होती.

महावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडळातील कार्यक्षेत्रामध्ये अदानी इलेक्ट्रिकल्स कंपनीने वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे परवानगी मागितली आहे. त्याच्या निषेधार्थ महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी संप सुरू केला होता. संघटनेचे उपाध्यक्ष सतीशराव भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संपत धीरज गायकवाड ,अमित तिजोरी, गणेश कुंभारे, रावसाहेब बांदल यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अनेक तास रोहीत्राची दुरुस्ती

संपामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक तास रोहीत्राची दुरुस्ती होऊ शकली नाही त्यामुळे कामकाज ठप्प झालेले होते.

संपात 32 संघटना सहभागी

महावितरण कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात 32 संघटना सहभागी झाले आहेत सर्वांनी एकत्र मिळून हा संप केला आहे. असे सतीश भुजबळ यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...