आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर:प्रवीण दरेकर-शिवाजी कर्डिले, तुम्ही मास्क काढला, आम्ही हे बेजबाबदार चेहरेच फोटोतून काढतोय...

अहमदनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खुर्ची-पद मिळाल्याने कोणी ‘जबाबदार’ होत नाही

प्रवीण दरेकरजी, शिवाजी कर्डिलेजी, आम्ही आपला चेहरा झाकलाय. कारण आपण मास्क घातलेला नाही. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढतेय. नगरमध्ये रोज ३ हजारांवर रुग्ण आढळत आहेत. आपण राज्याचे विरोधी पक्षनेते, लोकप्रतिनिधी आहात. लोक आपल्याला मानतात. लोकांनी मास्क घालावा म्हणून आपण नेहमी आग्रही असता.

...पण मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आमदार बबनराव पाचपुते, पोलिस अधीक्षक मनोज पाटील,जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महापौर बाबासाहेब वाकळे, महेंद्र गंधे, प्रसाद ढोकरीकर,अॅड. अभय आगरकर, मनपा आयुक्त शंकर गोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा या सर्वांनी मास्क लावले होते. केवळ आपणच मास्क लावलेला नव्हता. म्हणून आम्ही आपले चेहरे झाकले आहेत. सध्याच्या काळात मास्क हीच खरी लस आहे.

बातम्या आणखी आहेत...