आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक:मोहटा देवस्थानात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण, घटी बसणाऱ्या महिलांसाठी वॉटरप्रूफ मंडप

पाथर्डी2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शारदीय नवरात्रोत्सवाची मोहटा देवस्थानात तयारी पूर्ण झाली आहे. यंदा भाविकांच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता असून घटी बसणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र वॉटरप्रूफ भव्य मंडप उभारणीचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली.

२६ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर पर्यंत यात्रा कालावधीत राज्यासह मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक राज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. भणगे म्हणाले, जिल्हा न्यायाधीश तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष सुनील गोसावी सर्व विश्वस्त व विविध शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांसह नियोजन बैठकांमध्ये खरखड्या अंतिम रूप देयता आले. उत्सवानिमित्त रामराव महाराज ढोक यांच्या श्रीराम कथेचे आयोजन केले आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजता देवीचा मुखवटा मोहटे गावातून गडावर येऊन त्यानंतर घटस्थापना होईल. भजन, कीर्तन, जागर, हरिपाठ गड प्रदक्षिणा, गोंधळ गीते, सुवासिनी पूजन,होमहवन असे विविध कार्यक्रम उत्सव कालावधीत होणार आहेत. चार ऑक्टोबर रोजी कावडीच्या पाण्याने देवी मूर्तीला जलाभिषेक, विजयादशमीला सीमोल्लंघन सोहा हो ऊन दुसऱ्या दिवशी एकादशीला देवीची यात्रा होईल. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता होमाची पूर्णाहुती होईल. सात ऑक्टोबरला कलाकारांच्या हजरी, कुस्त्यांचा हगामा होणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या सायंकाळच्या महाआरतीने नवरात्र उत्सवाची सांगता होईल.

मोहटा गडावरील मोहटादेवीचे मंदिर. दर्शन पास, गाभारा दर्शन व व्हीआयपी दर्शन बंद यंदा प्रथमच यात्रा काळात मोफत दर्शन पास, गाभारा दर्शन व व्हीआयपी दर्शन सेवा बंद करण्याचा निर्णय प्रशासकीय बैठकीत घेण्यात आल्याने कोणीही गाभारा दर्शनाचा आग्रह यात्रा कालावधीत धरू नये, असे आवाहन भणगे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...