आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रोत्सव:कंरजी येथे उत्तरेश्वर यात्रेसाठी तयारी सुरू, यात्रा समितीकडून कुस्ती मैदानाची पाहणी; 14 एप्रिलपासून होणार सुरुवात

करंजी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थानचा यात्रा उत्सव गुरुवारी, १४ एप्रिलपासून सुरू होत आहे. दोन दिवस हा यात्रा उत्सव सुरू राहणार आहे.

कोरोना महामारीमुळे दोन वर्ष यात्रा उत्सव स्थगित करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता यात्रा कमिटीने देखील यात्रा उत्सवाची जोरदार तयारी केली आहे.

करंजी येथील यात्रेनिमित्त कुस्त्यांचा जंगी हंगामा भरला जातो. यावर्षी कुस्त्यांचे आयोजन नवनाथ विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले असून या ठिकाणी नव्याने उभारलेल्या कुस्ती स्टेडियमची पाहणी नुकतीच यात्रा कमिटीकडून करण्यात आली. जिल्ह्यासह राज्यभरातून नामवंत पहेलवानांना हजारोंचे बक्षीस देण्याचे नियोजन यात्रा कमिटीकडून करण्यात आले असून जास्तीत जास्त कुस्तीपटूंनी शुक्रवारी, १५ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता नवनाथ विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात येणाऱ्या कुस्ती मैदानात सहभागी होण्याचे आवाहन सरपंच बाळासाहेब आकोलकर, माजी सभापती मिर्झा मणियार, माजी सरपंच सुनील साखरे, उपसरपंच भाऊसाहेब क्षेत्रे यांनी केले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य डी. व्ही. अकोलकर, यात्रा कमिटीचे सदस्य माजी सरपंच राजेंद्र क्षेत्रे, शरदराव अकोलकर, सुधाकर अकोलकर, नामदेव मुखेकर, बंडू अकोलकर, बाळासाहेब अकोलकर, उत्तम आकोलकर, सुभाष आकोलकर, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब गाडेकर, नवनाथ आरोळे, राहुल अकोलकर, सुनील अकोलकर, आसाराम आकोलकर, बबन अकोलकर, युवानेते विवेक मोरे, विश्वास क्षेत्रे, अभय गुगळे, सुनील मुरडे, मारुती मोरे, भाऊसाहेब मोरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...