आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार लंकेंचे उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे:अजित पवारांच्या उपस्थितीत आंदोलन स्थगित; समर्थकांनी केला जल्लोष

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महामार्गांच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी सुरू केलेले उपोषण शनिवारी (10 डिसेंबर) ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत मागे घेण्यात आले. लेखी आश्वासनानंतर लंके यांनी उपोषण मागे घेतल्याने लंके समर्थकांनी जल्लोष केला.

राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती तातडीने करावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी बुधवार ( 7 डिसेंबर) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गेल्या चार दिवसापासून हे उपोषण सुरू होते.लंके यांच्या उपोषणाचा शनिवारी चौथा दिवस होता. दुपारी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उपोषण स्थळी आमदार लंके यांची भेट घेतली.

समर्थकांनी लंके यांना खांद्यावर घेऊन जल्लोष केला.
समर्थकांनी लंके यांना खांद्यावर घेऊन जल्लोष केला.

मागण्याबाबत सविस्तर माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले उपस्थित होते. यावेळी पवार यांनी लंके यांना ज्यूस देऊन त्यांचे उपोषण सोडविले. यावेळी अजित पवार म्हणाले, जिल्ह्यातील महत्त्वाच्या महामार्गासाठी लंके यांनी उपोषण सुरू केले आहे. यातील बहुतांशी विषय हे केंद्राच्या राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील लंके यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. मी देखील लंके यांच्याशी तीन दिवसापासून संपर्कात होतो. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात लंके यांना भेटून गेले आजी-माजी आमदार देखील भेटून गेले. या प्रश्नाबाबत माझे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, असे पवार यांनी सांगितले.

प्रशासनाकडून मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर लंके यांनी आपले उपोषण मागे घ्यावे असे आवाहन पवार यांनी केले. त्यानंतर लंके यांनी सुरू केलेले उपोषण मागे घेतले आहे. उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केल्यानंतर समर्थकांनी लंके यांना खांद्यावर घेऊन जल्लोष केला.

बातम्या आणखी आहेत...