आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पाऊस:संगमनेर तालुक्यात सुसाट वाऱ्यासह पावसाची हजेरी

संगमनेर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुसाट वारा व मेघगर्जनेसह शुक्रवारी रात्री अर्धातास अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. काढणीस आलेल्या गहू, हरबरा व कांदा पिकाचे मोठ्या नुकसान नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पठारासह बऱ्याच भागात गहू झोपल्याने शेतकरी चिंतेत आहे. शुक्रवारी रात्री ७.३० वाजता शहरासह तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काढणीला आलेला गहू अक्षरशः झोपला. मक्याचे पीक पडले. पठारातील खंदरमाळ येथील शेतकरी बाळासाहेब भागवत यांच्या गाईवर वीज पडल्याने ती दगावली. नुकसानीची आकडेवारी रात्री उशिरापर्यंत मिळाली नाही. नुकसान झाल्याचा कुठलाच अहवाल मिळाला नसल्याचे तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी सांगितले. नुकसान क्षेत्राचे पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी किसान युवा क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सिताराम पानसरे व शेतकऱ्यांनी केली आहे. अचानक पडलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. छोटे-मोठे व्यापारी व भाजी विक्रेत्यांची यावेळी चांगलीच तारांबळ उडाली.

बातम्या आणखी आहेत...