आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान‎ होण्याची भीती:अवकाळी पावसाची‎ हजेरी; जीव टांगणीला‎

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या तीन दिवसांपासून नगर जिल्ह्यात ढगाळ हवामान‎ होते. नगर शहरसह जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी‎ (६ मार्च) सायंकाळी सातच्या सुमारास अवकाळी‎ पावसाने हजेरी लावली. हलक्या सरी कोसळल्याने‎ वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अवकाळी‎ पावसामुळे काढणीला आलेल्या गव्हाचे नुकसान‎ होण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला‎ लागला आहे. पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा‎ अंदाज वर्तवण्यात आला आहे.‎ नगर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ‎ वातावरण आहे.

हवामान विभागाने नगर जिल्ह्यात‎ पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार सायंकाळी‎ पाच वाजेपासून विजांचा कडकडाट सुरू झाला होता.‎ सायंकाळी सात वाजता शहरातील अनेक भागात‎ हलक्या पावसाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे,‎ सायंकाळी सात वाजता घरोघरी होळी पेटवण्याची‎ तयारी सुरू असतानाच पावसाचे आगमन झाले.‎ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावली.‎ या पावसामुळे शेतात काढून ठेवलेल्या गहू घरात घेऊन‎ जाण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली.

त्याचबरोबर‎ काही भागात काढणीला आलेला गहू भिजला. तसेच,‎ हरभरा पिकालादेखील अवकाळीचा फटका बसला.‎ अवकाळी पावसाच्या हजेरीने वातावरणात गारवा‎ निर्माण झाला असून, तापमान घसरले आहे. दिवसभर‎ शहर व परिसरात ढगाळ वातावरण होते. नेवासे‎ तालुक्यातील भेंडा, कुकाण येथेही अवकाळी पावसाने‎ हजेरी लावली.‎

बातम्या आणखी आहेत...