आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदभार स्वीकारला:श्रीक्षेत्र मोहटादेवी ट्रस्टच्या अध्यक्षपदी न्या. गोसावी

पाथर्डी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीक्षेत्र मोहटादेवी येथील श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टच्या चेअरमनपदी देवस्थानच्या घटनेतील तरतुदीनुसार अहमदनगरचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी जिल्हा न्यायाधीश-१ सुनील श्रीधर गोसावी यांची नेमणूक केली. मोहटादेवीची पूजा करून गोसावी यांनी देवस्थानच्या चेअरमनपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाशी संवाद साधतांना भाविक भक्तांसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यास व पर्यावरणपूरक योजना राबविण्यास प्राधान्य असेल, सर्वांचे सहकार्याने देवस्थानमार्फत विविध विकासकामे करण्यात येतील, असे ते म्हणाले.

आगामी शारदीय नवरात्र महोस्तवाचे नियोजित माहिरी घेऊन, या वर्षी भाविकांच्या वात्या गर्दी चा अंदाज असल्याने सुरक्षा, आरोग्य, सुलभ दर्शन व्यवस्था व त्याप्रमाणे केलेल्या उपाय योजनेचा आढावा घेण्यात आला. नवरात्र उत्सव कालावधीत भाविक भक्तांच्या सुविधेकरीता शासकीय यंत्रणा व स्वयंसेवी संस्था यांनी सहयोग करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी विश्वस्त अॅड. विजयकुमार वेलदे, अॅड. सुभाष काकडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...