आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरात लंपीला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी:जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जाहीर केले आदेश

अहमदनगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्हयामध्ये गोवंश व म्हैसवर्गीय पशुधनामध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये अधिसुचित केलेल्या रोगांमध्ये लंपी चर्मरोगाचा अनुसचित रोग म्हणून समावेश करण्यात आलेला आहे.

जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश

महाराष्ट्र शासनाच्या 8 सप्टेंबर 2022 च्या अधिसूचनेनुसार प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 (2009 चा 27 ) याची कलमे (6) (7) (11) (12) व (13) याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र शासनाने वरील अधिनियमान्वये अनुसूचित रोग असल्याचे घोषित केलेल्या लंपी चर्मरोगाच्या बाबतीत नियंत्रित क्षेत्र म्हणून संपुर्ण महाराष्ट्र राज्य घोषीत केलेले आहे. तसे आदेश अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जाहीर केले आहेत.

वाहतुकीस बंदी

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका जिल्हयातून दुसऱ्या जिल्हयात बाधीत जनावरांची वाहतूक केल्यामुळे बाधीत जनावरांपासून निरोगी जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. लंपी रोग हा विषाणुजन्य सांसर्गिक रोग असल्याने या रोगाचा प्रसार होवू नये म्हणून अहमदनगर जिल्हयात उपरोक्त अधिसूचनेनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 व महाराष्ट्र अधिसूचना 17 जून 2022 अन्वये त्यांना प्राप्त अधिकारान्वये लंपी स्कीन या अनुसुचित रोगाचा प्रतिबंध, नियंत्रण, निर्मुलन करण्यासाठी संपुर्ण अहमदनगर जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषीत केला आहे.

अहमदनगर जिल्हयात लंपी चर्मरोगावर (एलएसडी) नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचे निर्मुलन करता येईल आणि गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची ज्या ठिकाणी ते पाळले अथवा ठेवले जातात, त्या ठिकाणापासुन नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने आण करण्यास मनाई करण्यात आली आहे.

जनावरांना नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यास मनाई

अहमदनगर जिल्हयात गोजातीय प्रजातीची बाधीत असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी गोजातीय प्रजातीच्या कोणत्याही बाधीत झालेल्या प्राण्याच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्याच्या निवा-यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्याचे शव, कातडी किंवा कोणताही भाग किंवा अशा प्राण्याचे उत्पादन किंवा असे प्राणी नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करण्यात आली आहे. असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...