आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी भूषण पुरस्कार प्रदान:विविधतेत शेती फक्त महाराष्ट्रातच होते याचा अभिमान : राज्यपाल, पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांना जिजामाता कृषी भूषण पुरस्कार प्रदान

अकोले17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून देशात अन्नधान्य आयात करण्याची गरज ठेवली नाही, त्यांचे मी कौतुक करतो. विविधतेत शेती फक्त महाराष्ट्रातच होतेय, याचा मला अभिमान वाटतोय, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. पद्मश्री व नारिशक्ती पुरस्काराने सन्मानित तालुक्यातील बीजमाता राहीबाई पोपेरे यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून देण्यात येणारा राज्यस्तरीय जिजामाता कृषी भूषण पुरस्कार राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते नाशिक येथे प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादा भुसे, पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम उपस्थित होते.

ऑनलाइन मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहीबाई यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी निर्माण केलेल्या गावरान बियाणे बँकेचा उल्लेख करत अभिनंदन केले. शेतकरी केंद्रस्थानी ठेवून काम करण्यासाठी या पुरस्काराची रक्कम वाढवणार असल्याचे नमूद केले. महिला शेतकरी भगिनींना कृषी योजनांमध्ये पन्नास टक्के राखीव ठेवणार असल्याची घोषणा त्यांनी केली. उपमुख्मंत्री अजित पवार यांनी यापुढे पुरस्काराची रक्कम पाचपट वाढवण्याची घोषणा केली. पुण्यात अडीचशे कोटी गुंतवून कृषी भवन उभारले जाणार आहे. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा केला जाणार असल्याची माहिती देत महाराष्ट्राचा जिडीपी फक्त शेती क्षेत्रामुळे टिकून असल्याचे नमूद केले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी हजार तोंडाच्या रक्षसाशी रोज लढतो. अनेक संकटे झेलून न हारता तो शेती पिकवतो. ई पीक पाहणी शेतकरी वर्गासाठी शासनाने आणलीय, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याचे नमूद केले. महाराष्ट्र राज्य फळ पिकवणारे राज्य म्हणून प्रसिद्ध होत असल्याबद्दल अभिमान वाटतोय.

बातम्या आणखी आहेत...