आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदान:शासनाच्या अनुदान अगोदर मुळा कारखाना शेतकऱ्यांसाठी सरसावला; 6 हजार शेतकऱ्यांना सव्वातीन कोटीचे अनुदान

सोनईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण उसाचे गाळप होईपर्यंत कारखाने बंद करू नयेत, असे शासनाने आदेश दिले. मात्र १ मे नंतर कारखाना चालवावे लागल्याने साखर उताऱ्यात घट येऊन कारखान्यांचे जे नुकसान होते. त्याची भरपाई देण्याचे धोरण महाराष्ट्र शासनाने घेतले आहे. या अगोदरच मंत्री शंकरराव गडाख यांनी वाढदिवसानिमित्त सुमारे ६ हजार शेतकऱ्यांना सव्वा तीन कोटींचे अनुदान मुळा कारखान्याच्या वतीने वाटप करण्याच्या निर्णय घेतला. यानंतर शासनाचे अनुदान या शेतकऱ्यांना मिळणार आहे.

मात्र अतिरिक्त ऊस झाल्याने ज्या शेतकऱ्यांचा ऊस उशीरा गाळप झाला त्यांनाही जी आर्थिक झळ बसली ती विचारात घेऊन मुळा कारखान्याने अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अनुदान वाटप करण्याचा निर्णय घेऊन १६ एप्रिलपासून पुढे गाळप झालेल्या जवळपास ६ हजार शेतकऱ्यांना सव्वातीन कोटीचे अनुदान वाटप करण्याचा निर्णय झाला. चालू हंगामात मुळा कारखान्याने जवळपास १५ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठरवले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करतानाच कोणत्याही शेतकऱ्यांचा ऊस गाळपाविना शेतात उभा राहणार नाही याप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचना कारखान्याचे मार्गदर्शक मंत्री गडाख यांनी संचालक मंडळ व अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. कार्यक्रमप्रसंगी प्रतिनिधिक स्वरूपात पाच गावातील शेतकऱ्यांना कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाच्या हस्ते अनुदान वाटप करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...