आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:शिष्यवृत्ती परीक्षेत पृथ्वीराज नेहे पहिला

संगमनेर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी पृथ्वीराज किरण नेहे याने २५४ गुण मिळवत तालुक्यात दुसरा तर विद्यालयात पहिला क्रमांक पटकावला.

तालुक्यातील सावरगावतळ येथील डॉ. किरण नेहे यांचा मुलगा पृथ्वीराज अमृतवाहिनी स्कूलमध्ये पाचवीचे शिक्षण घेत असताना त्याने शिष्यवृत्ती परीक्षा दिली. सध्या तो सहावीत आहे. त्याच्या यशाबद्दल संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख, प्राचार्य अंजली कन्नावर आदींसह शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...