आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:खासगी वाहनांनी मनमानी भाडे आकारू नये; आकारल्यास ई-मेल करा ; पवार

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सण -उत्सवाला सुरुवात झाली आहे. बुधवारपासून गणेशोत्सव सुरू होत असल्यामुळे खासगी वाहनांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. या कालावधीत खासगी प्रवासी वाहनांनी प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे आकारणी करू नये. खाजगी प्रवासी वाहनचालकाकडून जादा भाडे आकारणी केली जात असल्यास प्रवाशांनी थेट अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन मंडळाच्या अधिकृत dycommr.enf2@gmail.com तक्रार करावी, असे आवाहन अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन मंडळाच्या अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.

सणासुदीच्या कालावधीमध्ये गावाकडे जाण्यासाठी सरकारी तसेच खासगी वाहनांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. या सणासुदीच्या कालावधीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ठरवलेल्या प्रत्येक किलोमीटर भाडेदाराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक भाडे राहणार नाही. याची दक्षता खासगी वाहनचालकांनी घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...