आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत आणि जामखेड या दोन्ही ठिकाणी आमदार रोहित पवार यांनी ‘साहेब चषक २०२२’ ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जामखेडमध्ये या स्पर्धेचे उद्घाटन तर कर्जतमध्ये बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवरील टेनिस बॉल क्रिकेटपटू कृष्णा सातपुते, अक्षय तावरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जामखेड शहरातील बीड रोडवर असलेल्या ‘शंभूराजे क्रिकेट क्लब’च्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले आहे. तालुक्यातील अनेक संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. क्रिकेटप्रेमींनीही या स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला आहे. आमदार रोहित पवार आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत साहेब चषक स्पर्धेचा शुक्रवारी उद्घाटन झाले. स्पर्धेतील चुरस पहायला मिळाली. यावेळी उपस्थित असलेले आंतरराष्ट्रीय पातळीवरील टेनिसबॉल क्रिकेटपटू कृष्णा सातपुते यांनी उद्घाटनाच्या सामन्यात एकाच षटकात पाच षटकार लगावत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. हा उत्साह पाहून प्रेक्षकांमध्येही एक वेगळीच ऊर्जा संचारली होती.
कर्जत तालुका स्पर्धेचे बक्षीस वितरण केदार जाधव आणि आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. शिरुर येथील यशवंत भाऊ पाचंगे यांच्या ‘शिरुर एलेवन’ संघाने ‘साहेब चषक २०२२’ पटकावला तर मिरजगावच्या छत्रपती जिनींगचा ‘बारामती एंगर्स’ हा संघ उपविजेता ठरला. कडा येथील ‘स्पीड एलेवन’ संघाने तृतिय तर खेड येथील सतीश मोरे प्रतिष्ठानच्या संघाने चौथे पारितोषिक पटकावले.
ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ
खा. शरद पवार यांच्या वाढदिवस दरवर्षीच विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. ‘साहेब चषक’ स्पर्धाही त्याचाच एक भाग आहे. या स्पर्धेमुळे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि एक व्यासपीठही मिळते. भविष्यातही नियमित असे उपक्रम राबविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.''-रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.