आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:संविधान दिनानिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे

अकोले2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील विधी सेवा समिती व तालुका वकील संघाचे संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त तालुक्यातून विविध शाळांमधून २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत ‘संविधान दिनाचे महत्व’ या विषयावर चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

या स्पर्धेतील शाळांतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावरील विद्यार्थ्यांना सुभाष वारे लिखीत आपले भविष्य भारतीय संविधान पुस्तकासह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.अकोले तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा अकोले न्यायालयाचे प्रथमवर्ग प्रधान दिवाणी न्यायाधीश राहुल गायकवाड, दिवाणी न्यायाधीश परवतकर, अकोले वकील संघाच्या अध्यक्ष ॲड सरोजिनी नेहे यांचे हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

अभिनव शिक्षण संस्था, कन्या विद्या मंदिर, अगस्ती माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या शाळांतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. पारितोषिक वितरण समारंभास ज्येष्ठ वकील ॲड के. बी. हांडे, सदानंद पोखरकर, राम भांगरे, बादशहा चौधरी, पुष्पा वाकचौरे, मंगल हांडे, डी. एम. काकड. व शालेय शिक्षक, शिक्षिका तसेच न्यायालयीन कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. संजय वाकचौरे यांनी सूत्रसंचालन केले. आभार ॲड. संभाजी जाधव यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...