आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:प्रा. मयूर कांगणे यांचा 1000 वटवृक्ष लावण्याचा संकल्प, न्यू आर्टस् कॉलेजातही केले वृक्षारोपण

नगर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरातील प्रा. मयूर कांगणे यांनी २०१७ साली १००० वटवृक्ष लावण्याचा आणि संवर्धन करण्याचा संकल्प केला होता. त्यापैकी आजपर्यंत त्यांनी २०३ वटवृक्षाची लागवड करून त्याचे संवर्धनही केले आहे. याचाच भाग म्हणून “लक्ष्य १००० वटवृक्ष” हा उपक्रम नगर शहरातील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या मैदानात राबवण्यात आला. महाविद्यालयातील मैदानाच्या बाजूला ७ ठिकाणी वटवृक्षांची लागवड रविवारी करण्यात आली.

नगर शहरातील न्यू आर्टस् महाविद्यालयातील कार्यक्रमास गणित विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. बी. गायकवाड आणि प्रा. प्रफुलचंद्र पवार यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात झाली. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे आणि न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. या उपक्रमामध्ये सेवा फाउंडेशनचे अभिषेक ढाकणे यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ. सुनीता व्यवहारे, डॉ. महेश बराटे, डॉ. सुवर्णमाला गोखले, उद्योजिका प्रिया देशमाने, प्रा. ज्ञानेश जावळे, अभिराज नारसीकर, श्रीप्रसाद मेहेत्रे, वाघ, सचिन गवते, अमित दळवी, संतोष सासवडे, सागर सुडके, उत्कर्ष अाचवले, दीपक कावळे, सविता जगधने, शशांक राऊत, संकेत पिसे आणि प्रा. हितेश दहिफळे आदिंनी श्रमदान करून या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.