आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील माजी आमदार स्व. नवनीतभाई बार्शीकर यांच्या कुटुंबातील सर्वेश बार्शीकर व स्वरुप बार्शीकर यांना अर्बन बँक चौकातील त्यांच्या दुकानासमोरच मारहाण झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. गाडी लावणे व हॉर्न वाजविण्यावरून वाद झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अर्बन बँक चौकात नवनीतभाई बार्शीकर यांच्या कुटुंबीयांचे दुकान आहे. या दुकानासमोर सर्वेश व स्वरुप बार्शीकर यांना मारहाण झाली. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या घटनेत सर्वेश बार्शीकर हे जखमी झाले असून, त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.