आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्षिक स्नेहसंमेलन:स्नेहसंमेलनानिमित्त सारडा‎ महाविद्यालयात कार्यक्रम‎

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पेमराज सारडा महाविद्यालयामध्ये चार दिवस‎ वार्षिक स्नेहसंमेलन रंगणार आहे. ८ ते ११ फेब्रुवारी‎ दरम्यान महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन‎ करण्यात आले आहे. औरंगाबाद येथील कवी नारायण‎ पुरी यांच्या हस्ते वार्षिक पारितोषिक वितरण होणार‎ आहे, अशी माहिती सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य‎ डॉ. माहेश्वरी गावित यांनी दिली. ८ फेब्रुवारी रोजी‎ स्नेहसंमेलनाच्या कार्याध्यक्षा डॉ. स्वाती पवार यांच्या‎ हस्ते ध्वजारोहणाने स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांना‎ सुरवात होईल.

विद्यार्थिनींसाठी खास साडी डेचे‎ आयोजन केले आहे. तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार‎ आहे. ९ फेब्रुवारी रोजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मिस‎ मॅच डे साजरा करणार आहेत. तसेच मेहंदी व‎ काव्यवाचन स्पर्धाही होणार आहेत. १० फेब्रुवारी‎ रोजी बॉलिवूड रेट्रो थीमचे आयोजन करण्यात आले‎ आहे. तसेच गायन, वादन, नृत्य, मिमिक्री आदी‎ टॅलेंट शो व निबंध स्पर्धा होणार आहेत. ११ फेब्रुवारी‎ वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ, फूड सॉल,‎ रांगोळी सपर्धा व ट्वीनिंग डेचे आयोजन करण्यात‎ आले आहे. या महाविद्यालयाचे उपप्राचार्य मिलिंद‎ देशपांडे, उपप्राचार्य डॉ. मंगला भोसले, पर्यावेक्षक‎ सुजित कुमावत, डॉ. स्मिता भुसे, गिरीष पाखरे व‎ प्रबंधक अशोक असेरी स्नेहसंमेलनाचे नियोजन‎ करीत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...