आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

32 लाखांचा मुद्देमाल जप्त:प्रतिबंधित मांगूर माशाची तस्करी; आठ जण अटकेत

श्रीरामपूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिबंधित असलेल्या मांगूर माशाची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी आठजणांविरुध्द कारवाई केली. तीन टन मांगूर माशासह ३२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.शहर पोलिसांना मांगूर माशाची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना मिळाली.

त्यानुसार सपोनि विठ्ठल पाटील, सपोनी. जीवन बोरसे, पोसई समाधान सुरवाडे, हेड कॉन्स्टेबल लाला पटेल, गणेश गावडे, नरवडे, लगड, कातखडे, अत्तार, भारत तमनर, जाधव यांनी बेलापूर नेवासे जाणाऱ्या रस्त्यावर टाटा आशर ट्रक (एमएच ४६ बीयू ७८६६) हा मिळून आला.

यात साडेचार लाखांची अंदाजे तीन टन वजनाचे अंदाजे १५० रुपये प्रती किलो वजनाचे मांगूर प्रजातीचे मासे, २८ लाख रुपये किमतीचा एक टाटा आयशर कंपनीचा मालवाहतुकीचा ट्रक सापडला. हवालदार क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन असादुल मंडल मुफूजर रेहमान मंडल (रा.पश्चिम बंगाल), अर्षद बाबुराली गाझी (रा. पश्निम बंगाल), मनोज रामधन यादव (हल्ली रा.रामधन यादव दत्त मंदिर चाळ, ठाणे, मुळ रा.मझाँवों, ता.बेल्लधारोड, जि.बलिया), विवेकानंद आत्मज उमाशंकर (रा.ग्राम पचवनिया, पोस्ट पचवनिया चकिया चंदौली, उत्तर प्रदेश), सुनील यादव (रा.चेरुइडीह बंदु कला मऊ, उत्तर प्रदेश), प्रदीपकुमार कंन्कराज मोरी (हल्ली रा.गळनिंब ता. नेवासे, मुळ रा.कैकलोरु, आंध्रप्रदेश), मुक्कमल विश्वास (वाहन मालक), मोहनेश्वर गणगे (जागा मालक) अशी आरोपींची नावे आहेत. हे मासे सहाय्यक मत्स्यव्यवसाय अधिकारी पी.एस. पाटेकर यांच्या मार्फत नष्ट करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...