आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:सीडी जैन कॉलेजात प्रकल्प अहवाल; बौद्धिक संपदा हक्क कार्यशाळा

श्रीरामपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रयत शिक्षण संस्थेच्या चंद्ररूप डाकले जैन वाणिज्य महाविद्यालयात संशोधन व वाणिज्य विभागातर्फे प्रकल्प अहवाल व बौद्धिक संपदा हक्क या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन संगमनेरचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर होते. याप्रसंगी प्रा. डॉ. बाळासाहेब बावके, वाणिज्य संशोधन विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र कळमकर, विजय नागपुरे उपस्थित होते.

कार्यशाळेत प्राचार्य निंबाळकर, गायकवाड, आरगडे यांनी संशोधन प्रकल्पाचे लेखन कसे करावे, सारांश कसा तयार करावा. विषयाची निवड व प्रकल्प अहवाल तयार करताना येणाऱ्या अडचणीवर मात कशी करावी. संशोधन पद्धतीचा वापर, नमुना निवड, आढावा कसा लिहावा, संदर्भसूची कोणत्या पद्धतीने मांडावी, संशोधन लेख, संशोधन लेखाची मांडणी कशाप्रकारे करावी व बौद्धिक संपदा हक्क, संशोधन लेखातील निष्कर्ष व शिफारशी कोणत्या पद्धतीने लिहाव्यात, याबाबत मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...