आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:शाश्वत शेतीसाठी योग्य जमीन वापर नियोजन करणे गरजेचे : डॉ. चौधरी

राहुरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात शाश्वत शेतीसाठी तसेच भरघोस उत्पादन वाढीसाठी जमीन वापर नियोजन अत्यंत आवश्यक आहे. योग्य जमीन वापर नियोजनासाठी मातीची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. सद्य परिस्थितीमध्ये डिजीटल मृद् विज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग या नवीन प्रणालींचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची गरज आहे. यामुळे नवीन पिढीला मर्यादित नैसर्गिक संसाधनांचा वापर शाश्वत पद्धतीने करण्यास मदत होईल असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाचे उपमहासंचालक डॉ. सुरेशकुमार चौधरी यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत हवामान अद्यावत शेतीसाठी शाश्वत जमीन आरोग्य व्यवस्थापन या विषयावरील ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नवी दिल्ली जीआयझेड, प्रो-सॉईलचे वरिष्ठ सल्लागार डॉ. इंद्रनील घोष, नवी दिल्ली येथील प्रो-सॉईल, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन व कृषी अभियांत्रिकी आणि प्रकल्प, जीआयझेडचे संचालक डॉ. राजीव अहल, अधिष्ठाता (कृषी) डॉ. प्रमोद रसाळ, भारतातील विविध संस्थांमधील मृदाशास्त्रज्ञ, प्रकल्पाचे प्रमुख संशोधक आणि या प्रशिक्षणाचे निमंत्रक व कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुनील गोरंटीवार, कृषी रसायन व मृदा शास्त्र विभाग प्रमुख व प्रशिक्षणाचे आयोजक डॉ. बापूसाहेब भाकरे, सहनिमंत्रक डॉ. मुकुंद शिंदे व सहआयोजक डॉ. अनिल दुरगुडे उपस्थित होते. डॉ. इंद्रनील घोष यांनी विद्यापीठ आणि जीआयझेड सारख्या संस्थांनी विद्यार्थी व शेतकर्यांच्या कल्याणासाठी एकत्र येवून काम करावे असे मत व्यक्त केले. पुणेचे तांत्रिक सल्लागार इंजिनियर रणजित जाधव यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...