आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात अधिक पोलिस कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाकडे वाढीव ५०० कर्मचारी मिळावेत, यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी दिली. तसेच गुन्हेगारांच्या शोधासाठी, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ''क्रिमिनल ट्रॅकिंग सिस्टीम'' या संगणक प्रणालीचा वापर पाच जिल्ह्यात केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बुधवारी सायंकाळी त्यांनी शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यास भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ''क्रिमिनल ट्रॅकिंग सिस्टीम'' प्रणालीची माहितीही त्यांनी दिली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अनिल कातकडे, निरीक्षक संपत शिंदे आदी उपस्थित होते. ‘
गुगल’चा वापर करून संगणक प्रणालीद्वारे गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचे प्रोफाइल तयार करणे, गुन्हेगारावर कोण पोलिस कर्मचारी, केव्हापासून लक्ष ठेवून आहे, पोलिस कर्मचाऱ्याने संबंधित गुन्हेगाराची पडताळणी केव्हा केली, याची सर्व अद्ययावत माहिती या ॲपद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उड्डाणपुलावर आता वेगमर्यादा शहरामध्ये उड्डाणपूल झाला. मात्र त्यावर अपघातही वाढल्याने त्याची दखल महानिरीक्षक डॉ. शेखर यांनी घेतली आहे. उड्डाणपूलावरुन धावणाऱ्या वाहनांसाठी वेग मर्यादा लागू केली जाणार असून, तशी ५० किमीपेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाईल, त्यासाठी स्पीड लिमिट बोर्ड, स्पीडगन, कर्मचारी नियुक्ती आदी उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी मोहीम
पुढील महिनाभरात विविध शोध मोहिमा राबवण्याचे आदेशही महानिरीक्षक डॉ. शेखर यांनी जिल्हा पोलिस दलास दिले आहेत. मादक पदार्थ विक्री, गावठी कट्टे, बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे, यासाठी आगामी एक महिन्यात मोहीम राबविण्यात येणार आहे. गावठी कट्टा बाळगणाऱ्यासह व त्याला कट्टा विकणाऱ्याला मालकाला पकडले तर ५ हजारांचे बक्षीस दिले जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी उपाययोजना
जिल्ह्यात रस्ते अपघाताच्या दृष्टीने ''ब्लॅकस्पॉट'' निश्चित करण्यात आले होते. हे ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी वाहतूक निरीक्षक व उपअधीक्षकांवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. रस्त्याची परिस्थिती सुधारली आहे की नाही, यासाठी पूर्वीचे व उपाययोजना केल्यानंतरचे छायाचित्र मागवून घेतले जाते, असेही ते म्हणाले.
उड्डाणपुलावर आता वेगमर्यादा
शहरामध्ये उड्डाणपूल झाला. मात्र त्यावर अपघातही वाढल्याने त्याची दखल महानिरीक्षक डॉ. शेखर यांनी घेतली आहे. उड्डाणपूलावरुन धावणाऱ्या वाहनांसाठी वेग मर्यादा लागू केली जाणार असून, तशी ५० किमीपेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाईल, त्यासाठी स्पीड लिमिट बोर्ड, स्पीडगन, कर्मचारी नियुक्ती आदी उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.