आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंता सिंचनाची:16 वर्षांनंतर 486 किलोमीटर कालवा दुरुस्तीसाठी 66 कोटी रुपयांचा प्रस्ताव; मुळा धरणावरील सिंचन कालव्यांचे 2005 मध्ये झाले होते नुतनीकरण

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणावर उजवा व डावा हे दोन मुख्य कालवे असून सिंचनासाठी उपकालवेही आहेत. या कालव्यांचे २००५ मध्ये नूतनीकरण झाले होते, परंतु सद्यस्थितीत कालव्यांचे भराव ढासळत असून प्रत्येक आवर्तनाला सुमारे ३०० दशलक्ष घनफूट पाण्याचा अपव्यय होत आहे. अपव्यय टाळण्यासाठी कालवा नुतनीकरणाचा ६६ कोटींचा प्रस्ताव मुळा विभागाने शासनाकडे पाठवला आहे. या प्रस्तावाची छाननी वरिष्ठ स्तरावर सुरू आहे.

मुख्य उजवा कालवा ५२ किलोमीटर, तर डावा मुख्य कालवा ३० किलोमीटर लांबीचा आहे. मुख्य कालव्यातून थेट शेतापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी सुमारे ४०० किलोमीटरचे लहान-मोठे उपकालवे तसेच लहान चाऱ्यांची व्यवस्था आहे. या कालव्याचे भराव ढासळत असून त्याच्या नुतनीकरणाची दुरुस्तीची गरज आहे. मुळा विभागाने पाठवलेल्या प्रस्तावाची वरीष्ठ स्तरावर छाननी सुरु आहे. या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच प्रक्रियेला सुरुवात होईल.

बातम्या आणखी आहेत...