आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोपरगाव कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे भाग्य उजाडल्यानंतर आता ग्रामीण पोलिस ठाण्याने नूतन वास्तुसाठी जागा निश्चित केली. प्रस्तावित नवीन जागेसाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी व शासन स्तरावर लालफितीत अडकला आहे, त्यास मंजूरी मिळताच लवकरच ग्रामीण पोलिस ठाण्याला स्वत:च्या प्रस्तावित जागेत नवीन इमारत उभी रहाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सध्या ग्रामीण पेालिस ठाणे सिटी सर्व्हे नंबर १६२४ मध्ये कार्यरत आहे. ५३६२ चौरस फूट मधील २००० चौरस फूट ग्रामीण पोलिस ठाण्याने नगरपालिकेकडे रितसर मागणी करून तसा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. एकूण ५३ गुंठ्याची जागा असून त्यापैकी २० गुंठे जागा ग्रामीण पोलिस ठाण्याला मंजूर झाली. नगरपालिकेने नाहरकत दिली असून सदर जागा नुकतीच पोलिस ठाण्याकडे वर्ग केली. त्यात आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, प्रशासक मुख्याधिकारी शांताराम गोसावी, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी योगदान दिले. तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख कार्यालयाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तातडीने लागणारे नकाशे व इतर बाबींची पुर्तता करून देण्यात आली. नवीन जागेबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो जिल्हाधिकारी भोसले यांचेकडे पाठवण्यात आला. आता तो त्यांचेकडून शासनस्तरावर गृहमंत्रालयाकडे गेल्यावर त्यास लवकरच मंजुरी मिळणार आहे, अशी माहिती ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक दौलतराव जाधव यांनी दिली. कोपरगाव शहर पोलिस ठाणे व शिर्डी पेालिस ठाणे या दोन इमारती नुकत्याच उपमुख्यमंत्री व विविध मंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आल्या आहेत. आता शहर पोलिस ठाण्याचे जसे पोलिस ठाण्यात रुपांतर झाले, ग्रामीण पोलिस ठाण्याचीही जागेची वाणवा संपुष्टात येणार आहे. कोपरगाव शहरात जुन्या जागेतील ग्रामीण पोलिस ठाणे आता नव्या जागेत होईल. नवीन पोलिस इमारतीसह पोलिस वसाहतही होणार ग्रामीण पोलिस ठाणे सध्या कार्यरत असलेली जागा आता नगरपालिकेने पोलिस ठाण्याकडे हस्तांतरित केली. त्याच जागेवर आता लवकरच नवीन पोलिस ठाण्याची प्रशस्त इमारत आजी- माजी लोकप्रतिनिधींनी चालना दिल्यास दुसरी प्रशस्त इमारत कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणारी ठरणार आहे. तत्कालिन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे असतानापासून सुमारे २९ वर्षांपासून पोलिस ठाण्याच्या स्वत:च्या इमारतीचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. पोलिस कर्मचाऱ्यांसाठी वसाहत देखील होणार आहे. तोही प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आता आशा पल्लवित झाल्या . नवीन पोलिस इमारतीसह पोलिस वसाहतही होणार ग्रामीण पोलिस ठाणे सध्या कार्यरत असलेली जागा आता नगरपालिकेने पोलिस ठाण्याकडे हस्तांतरित केली. त्याच जागेवर आता लवकरच नवीन पोलिस ठाण्याची प्रशस्त इमारत आजी- माजी लोकप्रतिनिधींनी चालना दिल्यास दुसरी प्रशस्त इमारत कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणारी ठरणार आहे. तत्कालिन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे असतानापासून सुमारे २९ वर्षांपासून पोलिस ठाण्याच्या स्वत:च्या इमारतीचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. पोलिस कर्मचाऱ्यांसाठी वसाहत देखील होणार आहे. तोही प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आता आशा पल्लवित झाल्या . कोपरगाव शहरात जुन्या जागेतील ग्रामीण पोलिस ठाणे आता नव्या जागेत होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.