आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे चिल्लर फेक आंदोलन:​​​​​​​चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपाच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र सुरु केले आहे. ज्या राष्ट्रपुरुषांनी महाराष्ट्र घडविला, त्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करुन चुकीचा इतिहास लोकांसमोर मांडण्याचे उद्योग सुरु आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य हा त्यांच्या त्यागाचा अपमान आहे. त्यांना शिवसेना स्टाईलनेच उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिला.

मंत्री पाटील यांच्या व्यक्तव्याच्या निषेधार्थ शहर शिवसेनेच्यावतीने त्यांच्या प्रतिमेवर चिल्लर फेकून आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख कदम, माजी विरोधीपक्ष नेता संजय शेंडगे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, दत्ता कावरे, संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, स्मिता अष्टेकर, रवि वाकळे, संदिप दातरंगे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...