आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गुंडाने केलेल्या वक्तव्याचा निषेध

जामखेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वंचित बहुजनचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्याबदल वक्तव्याचा निषेध करण्यात आला. वंचित बहुजन आघाडी जामखेड तालुक्याच्या वतीने ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली खर्डा चौक जामखेड येथे पनवेलचा तडीपार गावगुंड जग्या गायकवाड यांच्या निषेधार्थ आंदोलन केले. त्याला ताबडतोब अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अवैध मार्गाने कमावलेली जागा मालमत्ता संपत्ती व बँक अकाउंट याची चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

साेशल मीडियावर एक क्लिप व्हायरल होत असून या क्लिपमुळे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे जामखेड येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते जाधव यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. बापू ओहोळ म्हणाले, आदरणीय ॲड. प्रकाश आंबेडकरांचा अपमान म्हणजे बहुजन समाजाचा अपमान आहे. यावेळी अतिश पारवे, विशाल पवार, सर्जेराव पाटील, सचिन सदाफुले, सुरेश जाधव, अंकुश पवार, प्रमोद तुपिरे, प्रवीण बेलेकर, अमरनाथ डोंगरे, कल्याण आव्हाड, विशाल आव्हाड, सुरेश आव्हाड, भिमराव शेगर, विशाल शिंदे, अझर काझी, प्रकाश शिंदे, मच्छिंद्र जाधव, राजेश ओहोळ, सुरज बिरलिंगे, शिवाजी पवार, दिपक गव्हाळे, सचिन भिंगारदिवे, राजू शिंदे, अतुल ढोणे, संतोष चव्हाण, भीमराव चव्हाण उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...