आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:शिक्षकांच्या प्रश्नासाठी विधीमंडळासमोर धरणे

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुनी पेन्शन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांची रिक्त पदे तात्काळ भरण्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध प्रश्‍नांवर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने १९ डिसेंबरपासून नागपूर येथील हिवाळी अधिवेशन काळात विधीमंडळासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी दिला आहे.

शिक्षक व शिक्षकेतरांच्या प्रलंबीत मागण्या तातडीने मंजूर करण्याची मागणी गाणार यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व शिक्षण सचिव रणजीतसिंह देओल यांना पाठविण्यात आल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...