आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डी:भाव पडलेल्या फळांचे मोफत वाटप करून निषेध, आंदोलनस्थळी महसूलमंत्री थोरात, पटोलेंची भेट

शिर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विविध मागण्यांसाठी पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा किसान क्रांतीची मशाल पेटवली आहे. सरकारला सात दिवसांचा दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शेतमालाचे भाव गडगडलेल्या कांदा, टरबूज, द्राक्ष अशी फळे आaंदोलनस्थळी मोफत वाटप करून सरकारचा निषेध केला.

पुणतांबा येथे २३ मे रोजी ग्रामसभा घेऊन सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र सरकारने दखल घेतली नसल्याने १ जूनपासून येथील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. सरकारचा निषेध करण्यासाठी भाव पडलेल्या फळांचे मोफत वाटप करण्यात आले. गाळपाविना शिल्लक उसाच्या प्रश्नावरही शेतकरी आक्रमक असून सर्व उसाचे गाळप करण्याची जबाबदारी सरकारची असून त्याबाबत सरकारने गांभीर्याने घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

वर्ष २०१७ मध्ये किसान क्रांतीचे राज्यव्यापी आंदोलन झाले, त्यावेळी शिवसेना आणि कॉंग्रेसनेही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आता काँग्रेस आणि शिवसेना सरकारमध्ये असल्याने त्यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, असे शेतकऱ्यांनी म्हटले.

आम्ही शेतकऱ्यांसोबत
^शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्या काँग्रेस चिंतन शिबिराच्या माध्यमातून सरकारपुढे ठेवणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत.
- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.

बातम्या आणखी आहेत...