आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर गुरुवारी पेन्शनर्स संघटनेचे आंदोलन

नगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईपीएस ९५ पेन्शन संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची सुस्पष्टता देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेच्या वतीने सावेडी येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालया समोर गुरुवारी (१२ जानेवारी) सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयाप्रमाणे २९ डिसेंबर रोजी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने काढलेले परिपत्रक चुकीचे असल्याचे स्पष्ट करुन, या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनसंघटनेचे सरचिटणीस सुभाष कुलकर्णी, अध्यक्ष सर्जेराव दहिफळे, उपाध्यक्ष बाबूराव दळवी, ज्ञानदेव आहेर, अंकुश पवार, भागीनाथ काळे, आबा सोनवणे यांनी केले आहे.

ईपीएस ९५ पेन्शन संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्य खंडपीठाने नुकताच 4 नोव्हेंबर 2022 ला एक निर्णय दिला. त्याला अनुसरून भविष्य निर्वाह निधी संघटनेने २९ डिसेंबर २०२२ ला सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी एक परिपत्रक काढले आहे. परंतु हे परिपत्रक सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व निर्णयाप्रमाणे नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे.

याबाबत ईपीएफचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडून माहिती घेतली जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने म्हंटले आहे. भविष्य निर्वाह निधीच्या सहाय्यक आयुक्त मंजूषा आर. जाधव आंदोलकांशी संवाद साधून या विषयावर चर्चा करणार आहेत. सर्व परिस्थितीमध्ये पेन्शन धारकांमध्ये संभ्रम असून, त्याची सविस्तर माहिती ईपीएफओ कार्यालयाकडून घेतली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...