आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना नेते नितीन औताडे यांचा इशारा:रांजणगाव देशमुख रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन

कोपरगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगावला जोडणारा झगडेफाटा ते संगमनेर रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली अाहे. झगडेफाटा ते रांजणगाव देशमुख रोडवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. झगडेफाटा ते रंजनगांव देशमुख रस्त्याचे काम सुरू केले नाही, तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना नेते नितीन औताडे यांनी दिला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे झगडेफाटा ते रांजणगाव देशमुख या नादुरुस्त रस्त्याचा लेखाजोखाच त्यांनी निवेदनात मांडला आहे. कोपरगाव तालुक्यातील वीस ते पंचवीस गावांचा दैनंदिन संबंध कोपरगाव व संगमनेरसाठी दररोज येतो.

मात्र या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असून या खड्ड्यामुळे अनेक चारचाकी व दुचाकी स्वारांचे अपघात झाले आहेत. यात काहींना आपला जीव देखील गमवावा लागला. तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधीना देखील या नादुरुस्त रस्त्याच्या कामकाजाबाबत काही देणे घेणे नाही. या रस्त्याच्या कामकाजबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला नाही ही दुर्दैवी बाब आहे. प्रशासनाने या रस्त्याच्या कामाची तातडीने सुरुवात करावी अन्यथा परिसरातील नागरिकांना बरोबर घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा कोपरगाव तालुका शिवसेनेचे नेते औताडे यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...