आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझारखंड राज्यात २० जैन तीर्थंकरांचे महानिर्वाण क्षेत्र आहे. येथील पवित्र तीर्थ सम्मेदशिखरजी हे ठिकाण सरकारने पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ तालुक्यातील आश्वी येथील जैन समाजाने बुधवारी गाव बंद ठेऊन पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांना निवेदन देत हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली. जैन समाजाचे पवित्र तीर्थ सम्मेदशीखरजी पर्वत उर्फ पारसनाथ पर्वत झारखंड राज्यातील गिरडी जिल्ह्यात छोटा नागपुर येथे आहे. जैन धर्माचे २४ पैकी २० तिर्थंकर या ठिकाणी तप करून मोक्ष गतीला गेले होते. यामुळे ही भुमी जैन समाजासाठी पवित्र तीर्थ आहे.
या भूमीला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केल्याने जैन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ आश्वी बंद ठेऊन पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. आश्वी बंदला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेऊन नागरिकही मोर्चात सहभागी झाले. पोलिस निरीक्षक सुभाष भोये यांना निवेदन देण्यात आले. मांची हिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक शाळीग्राम होडगर, विनायक बालोटे, उपसरपंच राहुल जऱ्हाड, हरिभाऊ ताजणे, बाळकृष्ण होडगर, संतोष रासने, पंकज नाके, पंकज कोळपकर, योगेश कुलथे, हारुणभाई शेख, अरीफ शेख, फिरोज शेख, गणेश खेमनर, अनिल म्हसे, किशोर जऱ्हाड, डाॅ. अनिल बालोटे, चांगदेव खेमनर, नंदकिशोर लाहोटी, केदार बिहाणी, कैलास बिहाणी, सुमतीलाल गांधी, अश्वीनी पतसंस्थेचे उपाध्यक्ष विनीत गांधी, योगेश रातडीया, अनिकेत पटवा, संजय गांधी, प्रशांत गांधी, सुशिल भंडारी, श्रेणीक बोरा, अभीजीत गांधी, रोहीत भंडारी, निलेश चोपडा, अमित भंडारी, प्रितम गांधी, किरण गांधी, वैभव भंडारी, अश्वीन मुथ्था, उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.