आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळीमुळे नुकसान:नैसर्गिक आपत्तीतील‎ संकटांवर सरकारने दुर्लक्ष‎ केल्यामुळे अन्नत्याग‎, शेवगाव येथील शेतकऱ्यांचे आंदोलन

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांवर एका वर्षात‎ अनेक वेळा आलेल्या नैसर्गिक‎ आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे‎ आर्थिक नुकसान झालेले आहे. परंतु‎ याकडे शासनाने वेळोवेळी दुर्लक्ष‎ केल्याने शेतकरी बांधव हवालदिल‎ झाले आहे. पिकाला वाचवण्यासाठी‎ शेतकऱ्याचे कुटुंब नैसर्गिक‎ आपत्तीला तोंड देत आहे. सरकारने‎ शेतकऱ्यांकडे गांभीर्याने लक्ष‎ घालावे, अशी मागणी‎ शेतकऱ्यांकडून होत‎ आहे.सरकारकडून शेतकऱ्यांना‎ दिलासा मिळाला नाही. याचाच‎ निषेध म्हणून शेवगाव तालुक्यातील‎ नवीन दहिफळ येथील शेतकरी‎ यांचा जिल्हाधिकारी‎ कार्यालयासमोर तोंड झोडून‎ अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.‎

शेतकरी बाळासाहेब शिंदे,‎ सदाशिव शिंदे, नारायण गवांडे,‎ रामराव बेडके, एम.के.लाकडे,‎ विजय रणदिवे, भाऊसाहेब उंदरे,‎ सर्जेराव बेडके, विलास माळी,‎ भाऊराव गोलवड, एकनाथ इथापे,‎ जगन्नाथ शिंदे आदी उपस्थित होते.‎ निवेदनात म्हटले आहे की, नैसर्गिक‎ आपत्तीमध्ये नासाडी होऊन व‎ कवडीमोल मिळालेल्या बाजार‎ भावाने शेतकऱ्यांच्या कुटुंबाची‎ स्वप्न धुळीस मिळाली. याचाच‎ गांभीर्य सरकारने घेतला नाही.‎ शेतकरी अन्नदाता आज‎ कर्जबाजारी होऊन आर्थिक,‎ मानसिक व नैसर्गिक संकटात‎ सापडून मेटाकुटीला आला आहे.‎