आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर:लाल किल्ल्याबाबत प्रक्षोभक पोस्ट, नगरच्या युवकावर गुन्हा, आक्षेपार्ह व्हिडिओ स्टेटसला ठेवल्याने कारवाई

नगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा ध्वज, त्यानंतर पाकिस्तानसारखा हिरवा ध्वज फडकावल्याचा व्हिडिओ व त्याखाली ‘एक घंटे का काम, हो जाएगा’ असे प्रक्षोभक वाक्य असलेला आक्षेपार्ह व्हिडिओ स्टेटसला ठेवल्याप्रकरणी नगरच्या एका युवकावर कोतवाली पोलिस ठाण्यात राष्ट्रीय सन्मानाच्या अप्रतिष्ठेस प्रतिबंध अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल केला आहे.

अदनान आयाज सय्यद (वय २१, रा. कोतवाली पोलिस स्टेशनजवळ, नगर) असे आरोपीचे नाव आहे. आशा टॉकीज परिसरातील युवकाने आक्षेपार्ह व्हिडिओ स्टेटस म्हणून ठेवला होता. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकत असलेल्या या व्हिडिओत तिरंगा ध्वजाच्या जागेवर पाकिस्तानसारखा हिरवा झेंडा दाखवून ‘एक घंटे का काम, हो जाएगा’ अशी प्रक्षोभक पोस्ट करण्यात आली होती. १० जून रोजी रात्री याची माहिती मिळताच बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांनी याबाबत सोमवारी कोतवाली पोलिसात तक्रार दिली. कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या आदेशावरून विष्णू भागवत, रवी टकले, सागर निपसे, सुमीत गवळी, दीपक रोहोकले, तानाजी पवार, सुजय हिवाळे, संतोष गोमसाळे, अमोल गाडे, सोमनाथ राऊत, गणेश धोत्रे, सागर पालवे यांनी त्यास अटक केली.

बातम्या आणखी आहेत...