आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Protests In Front Of Ripai District Collector's Office Against Awhad's Murder; Demand For Strict Implementation To Prevent Atrocities On Dalits |marathi News

मागणी:आव्हाडच्या हत्येचा निषेधार्थ रिपाइंची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने; दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक अंमलबजावणीची मागणी

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) नगर पक्षातर्फे दलितांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी निदर्शने करण्यात आले. औरंगाबाद येथील मातंग समाजातील युवक मनोज आव्हाड याचा अमानुषपणे झालेल्या हत्येचा निषेध नोंदवण्यात आला.

रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, नगरसेवक राहुल कांबळे, जिल्ह्याचे नेते संजय कांबळे, िवेक भिंगारदिवे, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, महिला जिल्हाध्यक्ष आरती बडेकर, महेंद्र झिंझाडे, आकाश तांबे, गौरव साळवे, सतीश भैलुमे, रोहन कदम, योगेश त्रिभुवन, साजिद खान, कृपाल भिंगारदिवे, प्रतिक नरवडे, लोकेश बर्वे, अविनाश कांबळे, बाळासाहेब नेटके, अनिल बर्डे, बाळकृष्ण शेळके, सुरेखा नेटके, किशोर कांबळे, सिकंदर शेख, अविनाश कांबळे, बंटी गायकवाड, बापू जावळे, प्रशांत घोडके, प्रविण वाघमारे आदी सहभागी झाले होते.

शासकीय विश्रामगृह येथे एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने कार्यकर्ते धडकले. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपमध्ये वाढ करुन ती वेळेवर देण्यात यावी, मागासवर्गीय शासकीय विद्यार्थी वसतीगृहांना अनुदानात वाढ करावी आदी या मागण्या करण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...