आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामासाठी केलेल्या उपोषणादरम्यान जेवणावळी झडल्या. आपले उपोषण केवळ स्टंटबाजीचा प्रकार होता, असे कोणी सिद्ध केल्यास आमदारकीचा राजीनामा देऊन, राजकारणातून संन्यास घेऊ”, अशी माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली.
राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी केल्यानंतर लंके यांनी रस्त्याच्या कामासाठी उपोषणास बसलेल्या बोरुडे वस्तीवरील उपोषणार्थींची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की समाजहिताच्या प्रश्नासाठी कोणी स्टंटबाजी म्हणून टीका करीत असेल, तर त्यावर आपल्याला काही भाष्य करायचे नाही. माझ्याकडे पगारी कार्यकर्ते नाहीत.
सर्वसामान्यांना बरोबर घेऊन लोकप्रश्नांवर आवाज उठवल्यास त्रस्त जनता आपोआपच एकत्रित जमते. प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करतो. मात्र, काही नेत्यांना त्याचेही वाईट वाटत असेल, तर काही इलाज नाही. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर आपण लक्ष ठेवून आहोत. आपल्या आंदोलनानंतर कामे सुरू झाली असल्याचे ते म्हणाले.
यावेळी उपोषणकर्ते सोमनाथ बोरुडे, राजेंद्र बोरुडे व अन्य कार्यकर्त्यांनी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या खेर्डा रस्त्याच्या दुरवस्थेकडे आमदार लंके यांचे लक्ष वेधले. पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे, करनिरीक्षक सोमनाथ गर्जे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, ज्येष्ठ नेते राजेंद्र दौंड, रफिक शेख, माजी नगरसेवक बंडू बोरुडे, चॉंद मणियार, सीताराम बोरुडे आदी उपस्थित होते.़
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.